बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद……!

सोलापूर:- दिनांक पाच मे 2023 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध सामाजिक संस्था भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मजरेवाडी सोलापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर संस्कृती वलसंगकर मॅडम,सोलापूर ब्लड बँकेचे डॉक्टर योगेश पलेलू, पत्रकार प्रशांत कटारे, गुरुशांत मोकाशी,. मल्लू बाबा म्हेत्रे उपस्थित होते.भगवान बुद्ध सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा मानवता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल दादा रणधीरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिरास प्रीत कापून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मानवता विकास मंडळ या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मसाजी मामा गोतसुर्वे, खजिनदार भीमराव मामा गोतसुर्वे सर संचालक महेश भैय्या रणधीरे, पंचशील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया ठोंबरे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महालिंग यलगोंडे त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते भव्य रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी आणि प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले रक्तदान शिबिरासाठी सोलापूर ब्लड बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

रक्तदात्यांचा व रक्तदान टीमचा अध्यक्ष श्रीशैल दादा रणधीरे सर यांच्या हस्ते सोलापुरी शाल व बुके आणि रक्तदान सर्टिफिकेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री बाळासाहेब चट्टे सर यांनी तर आभार प्रदर्शन लिंगन्ना कोरे सर यांनी केले.




