आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ह.दे.प्रशालेत विश्वरत्न भारतरत्न बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी …….!

Spread the love

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) हरिभाई देवकरण प्रशाला येथे विश्वरत्न भारतरत्न बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रास्ताविक पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी केले. प्रमुख पाहुणे दत्ता गायकवाड मुख्याध्यापक प्रकाश कांबळे तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पर्यवेक्षक हस्ते प्रतिमेचे अनावरण करुन पूजन करण्यात आले. बुद्धवंदना औदुंबर सर्वगोड, गौतम कांबळे, रत्नाकर लोंढे तर सांवत मॅडम यांनी सादर केली. मुख्याध्यापकांच्या हस्ते मा प्रमुख पाहुणे दत्ता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड यांनी केला.

प्रमुख पाहुणे दत्ता गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेब यांनी सार्वजनिक कामाची सुरुवात सोलापूर मधून केली शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांनी पहिली घटना सोलापूरात लिहिली.तसेच शिक्षकांनी परिपूर्ण असले पाहिजे असे विचार डॉ. बाबासाहेब यांचे होते असे सांगितले.पंचशिलाचे आचरण करावे. संविधान हे बौद्ध धर्माच्या नीतिशास्त्र वर आधारित आहे असे ही सांगितले. मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक विचार मांडताना त्यांनी शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही तसेच विविध ग्रंथातून आचरण कसे करावे सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी हरहरे तर आभार पर्यवेक्षिका दीपा फाटक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!