आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये “महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर” यांची १३२ वी “जंयती” उत्साहात साजरी.*

Spread the love

सोलापूरः- सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय,यशोधरा प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोलापूर, यशोधरा मॉडेल स्कुल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानेशुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरीकरण्यात आली. कार्यक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  रमेश सुतकर सर, प्रमुख पाहूणे – मा.साहेबराव गायकवाड साहेब,(प्राचार्य, साई आयुवेर्दिक मेडिकल कॉलेज, वैराग, सोलापूर), मा. श्री. सुबोध सुतकर सर (प्राचार्य, यशोधरा ज्युनिअर कॉलेज, सोलापूर),   पंकज सुतकर सर (खजिनदार, सम्राट अशोक युवक मंडळ, सोलापूर), प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवानंद डुणगे सर या मान्यवरांच्या हस्ते

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी Facebook च्या माध्यमातुन Live करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.सुबोध सुतकर सर यांनी केले. शिक्षण संकुलातील सुधीर वाघ
सर, संजय धायगोडे सर इ. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष  रमेश सुतकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जीवनाबद्दल व विविध कायद्यांविषयी सांगितली व प्रमुख पाहूणे – साहेबराव गायकवाड  यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मधुरा चोपडे मॅडम तर आभार प्रदर्शन
 नारायण कारंडे यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!