ताज्या घडामोडी

चोखानी काँम्पुटर सेंटर , अँन्ड जुपिटर डायकेम या प्रोजेक्टचे औंढोली तील जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन.

छञपती शिवाजी महाराज पुतळा व सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करून औंढेखुर्द , औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच , उपसरपंच , उद्योजक चोखानी , त्यांचेबरोबर आलेले पाहुणे यांचेकडून उद्घाटन करण्यात आले.

Spread the love

चोखानी काँम्पुटर सेंटर , अँन्ड जुपिटर डायकेम या प्रोजेक्टचे औंढोली तील जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ८ जानेवारी.

चोखानी काँम्पुटर सेंटर , अँन्ड जुपिटर डायकेम या प्रोजेक्टचे औंढोली तील जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन नुकतेच निमेश चोखानी या उद्योजकाचे हस्ते सपत्निक करण्यात आले.
यावेळी छञपती शिवाजी महाराज पुतळा व सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करून औंढेखुर्द , औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच , उपसरपंच , उद्योजक चोखानी , त्यांचेबरोबर आलेले पाहुणे यांचेकडून उद्घाटन करण्यात आले.

शाळेच्या शिक्षिका ,ग्रामपंचायत सरपंच अरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य , शाळेचे अठरा वर्षे शिक्षक आसलेले सहादू मानकर , माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश केदारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी  चोखानी यांनी आपण या गावात अनेक वर्षे राहतोय, काहीतरी परतफेड म्हणून या शाळेतील विद्यार्थांना संगणक शिकून फार मोठ्या पदावर जाण्यासाठी हे पाच संगणक , प्रिंटर , प्रोजेक्टर व संगणक कक्ष बांधून दिला आहे.याचा या विद्यार्थांना व गावातील मुली , व महिला यांनी शिक्षणासाठी उपयोग करून घ्यावा , आसे या संगणक देण्यामागे उद्देश आहे,असे ते म्हणाले.

यावेळी माजी उपसरपंच निलेश नाणेकर म्हणाले , चोखानी परिवाराने यापूर्वी ग्रामपंचायतीचे स्वच्छता करीता कचरा वाहतूक करण्यासाठी घंटागाडी दिली आहे , कचराडेपोच नसल्याने गाडी उभी आहे , या गाडीतून कचरा नेलेला टाकण्यासाठी लोणावळा नगरपरिषद सहकार्य करीत नाही.त्यामुळे सुमारे एक कोटीचा खर्च कचराडेपो व प्रकल्पासाठी येईल,असे भाषणात सांगितले.

 

सहादू मानकर म्हणाले , यापूर्वी १९२८ मधे स्वातंञ्या पूर्वी ही शाळा झाली.येथे टाकवै खुर्द पासून विद्यार्थी येत आसत. याठिकाणी मागील वर्षी पटसंख्या घटल्यामुळे नवीन शिक्षिका नेमण्यात आली.गावातील नवनाथ मांडेकर , संदेश मांडेकर , ज्योती जांभूळकर , तसेच ग्रामपंचायत सदस्या    मांडेकर आणि तरूणांनी पालकांना समजावून सांगून गाठीभेटी घेतल्याने पट वाढला.शाळेचा टाळा लागायची वेळ टळली असे सांगितले.

औंढे विकास सोसायटी चे चेअरमन पंढरीनाथ मांडेकर म्हणाले , आम्ही या शाळेत चवथी पर्यत शिकलो , आम्हा बोबले गुरूजी व शेख गुरूजी यांनी चांगले शिकविल्याने आमच्यावर चांगले संस्कार झाले.त्यामुळे आम्ही आज इथे आहोत..यावेळी आभार माजी उपसरपंच नंदू विश्वासराव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!