ताज्या घडामोडी

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे   यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली..

कष्ट केले तर निवडणूक जिंकू शकतो, जुना काँग्रेसचा हा मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे. अजित पवार.

Spread the love

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे   यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ७ जानेवारी.

पिंपरी चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप  यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाले आहे. भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे   यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे २०१९ ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ते राहुल कलाटे यांनीही निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान अजित पवार हे नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय कसा शक्य आहे, राहुल काटे यांना किती मतं पडू शकतात हे सांगत असतांना चिंचवडचा इतिहासच अजित पवार यांनी सांगितला आहे.

अजित पवार यांनी राहुल कलाटे यांची माघार घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत राहुल कलाटे यांना मागील वेळेला मिळालेली मत आत्ताही पडतील असे नाही, त्यापेक्षा कमी किंवा जास्तही पडतील असे म्हंटले आहे.छोटी-छोटी गावं असल्यापासून शहराचा विकास होईपर्यंत मी काम केलं आहे, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणूनही पिंपरी चिंचवडची ओळख राहिली आहे.

सर्वाधिक मताधिक्य मला या मतदार संघातून मिळाले होते, त्यामुळे कष्ट केले तर निवडणूक जिंकू शकतो, जुना काँग्रेसचा हा मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे. शिवसेना ठाकरे गटाचीही मोठी ताकद आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना सहानुभूती आहे असं तुम्हीच म्हणताय म्हणत अजित पवार यांनी चिंचवडमध्ये नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय काटे हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे अजित पवार म्हणाले. निवडणूक लाईटली घेतली तर निवडणूक सोपी नाही, पण जर कष्ट घेतले तर निवडणूक अवघड पण नाही, १९९१ पासून मी इथून राजकीय सुरुवात केली आहे. देशात पहिल्या क्रमांकाची मतेही मला मिळाली होती. या शहरात कुणी लक्ष घातलं आणि शहराचा कायापालट कुणी केला असे जुन्या लोकांना विचारा असं म्हणत अजित पवार यांनी शहराच्या विकासाचा दावा करत विकास कामांचा पाढा वाचत आमचाच विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!