ताज्या घडामोडी
लोणावळ्यात साक्षरता कार्यशाळेत शेकडो महिलांची उपस्थिती.
लोणावळ्यात नगरपरिषद सभागृहात कार्यशाळा भारतीय टपाल खात्यातर्फे आयोजित करण्यात आली होती..
लोणावळ्यात साक्षरता कार्यशाळेत शेकडो महिलांची उपस्थिती.
आवाज न्यूज :लोणावळा प्रतिनिधी, ७ जानेवारी.

लोणावळ्यात नगरपरिषद सभागृहात भारतीय टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या साक्षरता कार्यशाळेत सुमारे शंभर ते सव्वाशे महिलांची उपस्थिती पहायला मिळाली. या सर्व बचतगटाच्या महिला वा मुलींनी या कार्यशाळेत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

पोस्टल जनरल पुणे , भारत डाक विभागाचे रामचंद्र जायभाये , पुणे ग्रामिण विभागप्रमुख भारत डाक विभागाचे बाळकृष्ण एरंडे , लोणावळा पोस्ट आॕफिसचे पोस्ट मास्तर भारत गवळी , पुणे पश्चिम डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक गणेश वडुरकर , बिलींग आॕफिसर .देशपांडे ,पुणे कार्यालयाच्या लर्निंग लिंक्स स्वाती दुधाने यांनी यावेळी महिला बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.



