ताज्या घडामोडी
महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा, देहू ते लोणावळा संपन्न.
जनजागर यात्रेचे’ श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या शहरांमध्ये स्वागत करण्यात आले.
राजकीय: महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा, देहू ते लोणावळा संपन्न.
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ जानेवारी.

वाढत्या महागाईच्या विरोधात व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागर यात्रा काढली.या ‘जनजागर यात्रेचे’ श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या शहरांमध्ये स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राज्य निरिक्षक डॉ. आशा मिरगे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, गणेश खांडगे.
आदी मान्यवरांचे लोणावळ्यात जनजागर यात्रेचे स्वागत करण्यात आले.

वाढत्या महागाईमुळे, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.परंतु सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.यावर आवाज उठविण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी , महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर करण्यात आला.त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर आपली भुमिका मांडुन सर्वसामान्यांना जागरुक करायचे आहे.

सावित्रीच्या लेकी महागाई विरोधात,बेरोजगारी विरोधात आवाज उठवून जागर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. सत्ताधारी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सर्वांनीच मतं व्यक्त करायला हवीत,असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे,जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी तालुका अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे,पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती बाबुराव वायकर,वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, जि.नि.समिती सदस्य विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, कार्याध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, ॲड.रुपाली दाभाडे,शितल हगवणे, पुष्पा घोजगे,संध्या थोरात,भिकाबाई वाघमारे,वर्षा नवघणे, सुरेश चौधरी, अरुण माने, दर्शन खांडगे, दिलिप खळदे, विशाल पवार, नंदकुमार कोतुळकर, हर्षद पवार,तसेच सर्व शहरांचे अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



