ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी सरनाईक यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर तुर्तास उपोषण स्थगित..

शाहू फुले आंबेडकर या संघटनेच्या वतीने दिनांक ५ जानेवारी रोजी नगरपरिषद परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला होता.माजी नगरसेवक अरुण माने.

Spread the love

मुख्याधिकारी सरनाईक यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर तुर्तास उपोषण स्थगित..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ५ जानेवारी.

शाहू फुले आंबेडकर या संघटनेच्या वतीने दिनांक ५ जानेवारी रोजी नगरपरिषद परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी लेखी दिलेल्या सकारात्मक पत्रानुसार सदर उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक अरुण माने यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत शहरात दिरंगाईने सुरू असलेल्या भुयारी गटार योजना, पाणी योजना त्यातून दुरावस्था झालेले अंतर्गत रस्ते आणि त्यामुळे करदात्या नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप थांबवण्यासाठी ही काम दिनांक ३१ डिसेंबर २२ पर्यंत पूर्ण करावीत अन्यथा दिनांक ५ जानेवारी रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन नगरपरिषद प्रशासनाला दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आले होते.

यास अनुसरून मुख्याधिकारी सरनाईक यांनी तळेगाव गावठाण मध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करत कोणत्या कामाला किती दिवस लागतील याबाबत लेखी माहिती शाहू फुले आंबेडकर समितीला देण्यात आली व उपोषण करू नये असे विनंतीचे आव्हान करण्यात आले यामुळे सदर उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शाहू फुले आंबेडकर समितीच्या सदस्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!