ताज्या घडामोडी
लोणावळ्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भिषण अपघात..
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली गावाच्या हद्दीत कारचा भिषण अपघात झाला. यामध्ये तळेगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.
लोणावळ्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भिषण अपघात..
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २ जानेवारी, २०२३.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली गावाच्या हद्दीत कारचा भिषण अपघात झाला. यामध्ये तळेगाव येथील दीपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून,
राहुल कैलास जाधव (वय 28, संत तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापु पवार (वय 51, रा. खंडोबा माळ पिंपरी), रोहन भगवान वाघमारे (वय 28, पिंपरी) हे तिघेजण जखमी झाले आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरी सर्वजण मोटार कार क्र. MH 14 JX 9385 मधून तळेगावच्या दिशेने जात असताना तुंगार्ली गावाच्या हद्दीत समोर जाणार्या कंटेनरला सदर मोटार कारची मागून जोरात धडक बसल्याने हा भिषण अपघात झाला.



