स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.
एकाग्रता, कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल".चेतना घोजगे..
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २ जानेवारी,२०२३.

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये 31डिसेंबर 2022 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.चेतना घोजगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. संतोष खांडगे , शालेय समिती उपाध्यक्षा. जयश्रीताई जोशी मॅडम,सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शालेय विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका. शमशाद शेख यांनी आंतरशालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपला खेळ प्रदर्शित करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे सांगून शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.
महोत्सवाचे प्रमुख पाहुणे मा.कु.चेतना घोजगे, स्वागतपर सत्कार संस्थापक अध्यक्ष. संतोष खांडगे यांनी केला. श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व उपस्थित संचालकांचा स्वागतपर सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका. शमशाद शेख यांनी केला.तद्नंतर सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्चपास व बांबू कवायत सादर केली.
“एकाग्रता, कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल”, असे मार्गदर्शन चेतना घोजगे यांनी विद्यार्थ्यांना केले.
कबड्डी, खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, क्रिकेट, डॉच बॉल यासारख्या विविध सामान्यांचे आयोजन करण्यात आले.सर्व खेळाडू मन लावून, सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. कबड्डी खो-खो हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले.
खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता, सहानभूती,शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते. या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो असे मोलाचे विचार अध्यक्ष.खांडगे यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. तसेच क्रीडा महोत्सवातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे .चेतना घोजगे, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. .संतोष खांडगे, सचिव . मिलिंद शेलार सर, खजिनदार मा. सुदाम दाभाडे, शालेय समिती उपाध्यक्षा. जयश्रीताई जोशी मॅडम,शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका रेणू शर्मा मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख.धनश्री पाटील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी , स्पर्धेतील खेळाडू व विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी”जय हो”जयघोष करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका रेणू शर्मा,शालेय क्रीडा प्रमुख प्रशांत भालेराव,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका .रुपाली कांबळे आणि सोनिका कांबळे यांनी केले.
या स्तुत्य उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे सर,शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे मॅडम, उपाध्यक्ष दादासाहेब उ-र्हे, सचिव मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.



