ताज्या घडामोडी

जांबवडे येथे कचरा उचलण्याचे काम करत असताना सफाई कर्मचाऱ्यावर केला बॅट ने हल्ला.

३२३ व ५०४ अन्वये तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

Spread the love

नवलाख उंबरे येथे कचरा उचलण्याचे काम करत असताना सफाई कर्मचाऱ्यावर केला बॅट ने हल्ला.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ डिसेंबर.

तुषार आनंद भोसले हे दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत कचरा उचलण्याचे काम करत असताना सचिन आनंदा शिंदे यांनी बॅट ने मारहाण केली.

ग्रामपंचायत जांबवडे येथील कर्मचारी  तुषार आनंदा भोसले हे  जांबवडे येथील गायरानात  कचरा उचलण्याचे काम करत असताना  त्यांना सचिन आनंदा शिंदे यांनी शिविगाळ करुन, बॅटने मारहाण केली व बेदम चोप दिला असता, तेथिल गावकऱ्यांनी भोसले यांना  संत तुकाराम हॉस्पिटल देहू येथे ॲडमिट केले व तेथुन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असा हॉस्पिटल मधुन फोन केल्याने, भा.दं.वि. कलम. ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीला चार दिवस होऊन गेले , तरीही पोलीस प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई झालेली नाही.

सचिन आनंदा शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तक्रार आयुक्तालयात करणार असल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!