ताज्या घडामोडी

श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ५ जणांनी टाकला सशस्त्र दरोडा.

तीन कामगारांसह एका सुरक्षारक्षकाला कोयत्याने केली मारहाण..

Spread the love

श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ५ जणांनी टाकला सशस्त्र दरोडा..

आवाज न्यूज:  पुणे प्रतिनिधी, २४ डिसेंबर …

पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत असणाऱ्या तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ५ जणांनी सशस्त्र दरोडा टाकून २२ हजार रुपये लुटले. तसेच तीन कामगारांसह एका सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली. त्यात ते गंभीरजखमी झाले आहेत. या प्रकरणी योगेश विनायक हिंगे (वय ३७, रा. हिंगे वाटर, टापरेवाडी, ता. भोर जि. पुणे) यांनी अज्ञात ५ आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पाच जण दोन दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी सुरक्षारक्षक भरत परिहार यांच्या हाताला पकडून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये आणले. त्यानंतर तेथील कॅश द्या, असे ओरडत शिवीगाळ केली. त्यांनी २२ हजार रुपये लुटत कोयत्यानेसुरक्षारक्षक व इतर तीन कामगारांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेने पलायन केले. या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व संजय सुतनासे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके रवाना झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!