पुढील महिन्याभरात तळेगाव शहरातील विकासकामांना मिळणार गती – आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे –
गेल्या २ वर्षाच्या काळात राज्य शासनामार्फत व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात भरघोस असा निधी महाविकास आघाडी व माजी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने आला. तळेगाव दाभाडे शहर विकासासाठी व भौतिक सोयी – सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी आला.
वैशिष्ट्यपूर्ण योजना / ठोक तरतूद / नाविन्यपूर्ण योजना / नगरोत्थान / दलितोत्तर निधी या शिर्षकाखाली तळेगाव शहरात रस्ते, सभागृह, आर.सी.सी.पाईपलाईन, नगरपरिषद इमारत यांचे काम सुरु असून काही कामे पूर्णत्वासही गेली आहेत.पुढील महिन्याभराच्या काळातही तळेगाव शहरात खालील कामे पूर्णत्वास जाणार आहेत. अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील
- प्रभाग क्र. १ मधील दाभाडे आळी ते राम मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.– ९ लक्ष ८४ हजार.
- प्रभाग क्र. ०४ वतननगरमधील गणेश मंदिरासमोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. –२२ लक्ष ५७ हजार
- प्रभाग क्र. ०४ तुळजाभवानी मंदिरासमोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे –२१ लक्ष १२ हजार
- प्रभाग क्र. ०४ संत ज्ञानेश्वर शाळेच्या बाजूकडील व मागील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – १३ लक्ष ८९ हजार.
- सुभाष चौक ते डोळसनाथ मंदिर ते गणपती चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – ७३ लक्ष ९७ हजार
- प्रभाग क्र, १० मधील मोकळ्या जागेत सभागृह बांधणे.- ४६ लक्ष ६४ हजार
- उमंग सोसायटी ते टेलिफोन एक्चेंज रस्ता सुधारणा करणे. – ४ कोटी.
- जिजामाता चौक ते घोरवाडी रेल्वे स्टेशन रस्ता करणे – १ कोटी.
- सोमाटणे फाटा ते तळेगाव पर्यंत रस्ता करणे. –१ कोटी.
- प्रभाग क्र. १० मधील चावडी चौक ते योगेश भोर यांचे घरापर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे. – ९० लक्ष ३९ हजार.
- प्रभाग क्र. १० मधील संजय दाभाडे यांचे घर ते राम मंदिर ते मेहता चेंबरपर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे. – ३० लक्ष २६ हजार
- प्रभाग क्र. ७ खांडगे कॉलनी येथील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – २१ लक्ष ५० हजार.
- प्रभाग क्र. ७ मधील एकविरा सोसायटी ते म्हाडा कॉलनीपर्यंत रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – २३ लक्ष ८८ हजार.
- सिद्धार्थनगर येथील अंतर्गत रस्ते व गटार करणे. – ४६ लक्ष २१ हजार
- वतननगर येथील अंबिका पार्क मधील रस्ता हॉटमिक्स हॉटलेड पद्धतीने कारपेट करणे – १० लक्ष ३७ हजार.
- तळेगाव दाभाडे येथे मंडल अधिकारी कार्यालय बांधणे. – २० लक्ष ३८ हजार.

अशी सुमारे ९ कोटी ९१ लक्ष ३० हजार रुपयांची कामे पुढील महिन्याभरात पूर्णत्वास जाऊन नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये नक्कीच वाढ होईल.



