कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे, येथील विद्यालयात मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व औषधांचे वाटप
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी , नागरे हॉस्पिटल आणि जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे येथे संपन्न.
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे, येथील विद्यालयात मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व औषधांचे वाटप..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,९ डिसेंबर.

दिनांक 08.12.2022 रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी , नागरे हॉस्पिटल आणि जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे येथील विद्यालयात मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व औषधोपचार वाटप समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. शंकर हदीमनी हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष रो.विन्सेंट सालेर यांनी यापुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.मुलांनी स्वतःची काळजी घ्यावी जेवण करण्या आधी स्वच्छ हात धुतले पाहिजे . फळ , पालेभाज्या आपल्या शरीराला जे पौस्टिक आहे असे खाल्ले पाहिजे .
या नंतर प्रकल्पप्रमुख रो.डाॅ.सुरभी नागरे यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची या विषयावर मार्गदर्शन करून तपासणी केली व त्यानुसारऔषधे दिली हिमोग्लोबीन तपासणी सहप्रकल्प प्रमुख रो.रूथ सालेर यांनी केली.रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे संस्थापक अध्यक्ष मा.रो.संतोष खाडंगे याच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी,रो बाळासाहेब शिंदे, रो सुनील खोल्लम, रों.दशरथ जांभुळकर, रो योगेश शिंदे रो. महादेव पाटील , रो नितीन नांगरे, रो संदीप मगर यांच्या सह कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. आभारप्रदर्शन कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याधापक मीना अय्यर यांनी केले.



