ताज्या घडामोडी

बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली..

बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो क्लस्टर येथे संपन्न..

Spread the love

 राजकीय :  बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ डिसेंबर.

बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड युवासेना प्रमुखपदी विश्वजीत बारणे, महिला संघटिकापदी सरिता साने आणि युवती विस्तारक पदी शर्वरी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली.

मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली. बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) पदाधिकारी जाहीर केले. २०० पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.

बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो क्लस्टर येथे पार पडला. उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पिंपरी, चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या उपजिल्हाप्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या उपजिल्हाप्रमुखपदी शरद हुलावळे, मावळ जिल्हा संघटकपदी अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख बशीर सुतार, दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी सुरेश राक्षे, पिंपरी-चिंचवड शहर संघटकपदी सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रम्हे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटकपदी सय्यद पटेल,

उपविधानसभा संघटकपदी शरद मुळे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, नामदेव घुले, पिंपरी विधानसभा संघटकपदी नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील येवले, पिंपरी विधानसभा समन्वयक सुनील पाथरमल, ॲड. दिलीप पाटील, रुपेश चांदेरे, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलग, महेश कलाल, चिंचवड विधानसभा संघटकपदी रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, चिंचवड विधानसभा समन्वयकपदी प्रदीप दळवी, हेमचंद्र जावळे, मयूर तरस, प्रसिद्धी प्रमुखपदी सागर पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!