ताज्या घडामोडी
तळेगाव स्टेशन येथे, गो. नी. दांडेकर. उद्यानाचा उद्या नामकरण सोहळा..
सायंकाळी पाच वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तळेगाव स्टेशन येथे गो. नी. दांडेकर. उद्यानाचा उद्या नामकरण सोहळा..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ७ डिसेंबर.

तळेगाव शहरातील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या उद्यानाचा नामकरण सोहळा दिनांक ८ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.




सदर उद्यानास महाराष्ट्र भूषण गो.नी. दांडेकर उद्यान नामकरण करण्यात आले असून सदर कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही संगीत रजनीचा कार्यक्रम तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी, तमाम रसिक श्रोत्यांनी आयुष्यावर बोलू काही या संगीत रजनीचा आनंद घेण्यासाठी आनंद नगर गार्डन येथे सायंकाळी पाच वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




