ताज्या घडामोडी

श्री दत्तजयंती निमित्ताने प्रेमनगरमधे तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

Spread the love

श्री दत्तजयंती निमित्ताने प्रेमनगरमधे तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

आवाज न्यूज :  लोणावळा ता.४ डिसेंबर (प्रतिनिधी )

दत्तजयंती निमित्ताने प्रेमनगरमधे तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे ता.६ ते ८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

गुरूपीठाधीश गुरूवर्य श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती आठल्येसर श्रीस्वामी समर्थवाडी , बदलापूर यांचे कृपाशिर्वादाने स्थापन केलेल्या श्री दत्तमंदिरात ता.६ पहाटे ४ते ६ कलशपूजन व काकडाआरती , सायंकाळी ५ते ६ हरिपाठ , राञी ७ ते ९ ह.भ.प.विजयाताई महाराज पंडीत ,(पेडगाव , श्रीगोंदा )यांचे कीर्तन होईल.

ता.७ रोजी पहाटे काकडाआरती , सकाळी स्वामी समर्थ पूजाविधी वश्रीचा आभिषेक व होमहवन होईल.
सायंकाळी ४ ते ६ ह.भ.प.आजिंक्य महारज चाकणकर (येरवडा , पुणे) यांचे कीर्तन श्रीदत्त जन्माख्यानावर होईल.सायंकाळी ६ते ७ महाप्रसाद होईल.राञी ८ नंतर श्रीची पालखीतून मिरवणूक निघेल.

ता.८ रोजी पहाटे काकडाआरती होईल.सकाळी १० ते १२ ह.भ.प.स्वप्निल महाराज दौडकर (करंजवणे ) यांचे कीर्तन होईल.दुपारी १२नंतर महाप्रसाद व सायंकाळी ५ निर्माल्य विसर्जन होईल..

श्री गुरूदत्त तरूण मंडळ , व विर मराठा ग्रूप , प्रेमनगर यांनी आयोजन केल्याचे संयोजक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!