जाणीव- आंतरिक ऊर्जेची!– डॉ. शाळीग्राम भंडारी..
विषय प्रत्येकाच्या आयुष्याशि निगडित आहे!-
जाणीव- आंतरिक ऊर्जेची!– विषय प्रत्येकाच्या आयुष्याशि निगडित आहे!-
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, डॉ शाळीग्राम भंडारी, ४ डिसेंबर.

परमेश्वराने प्रत्येकाला जन्मतः एक वरदान म्हणून जे दिल आहे ती आहे आंतरिक ऊर्जा! मित्रांनो ही जबरदस्त ऊर्जा केवळ आहार-विहार विश्रांती यांनी खचितच मिळत नसते! जरी ती आपल्यात कायम स्वरूपात अस्तित्वात असली तरी तिची जाणीव मात्र आपल्याला होत नाही! कारण आपली असलेली मानसिक उदासीनता संकुचित विचारसरणी आणि स्वतःला मर्यादित ठेवण्याची मनोवृत्ती!
जेव्हा आपण आपल मन आणि मेंदू नकळत बंदिस्त करून घेतो तेव्हा सुप्त अवस्थेत जाऊन ही ऊर्जा शक्तिहीन होते त्यामुळेच अंतकरणात सर्वत्र अंधार पसरतो ! कारण उपलब्ध असलेल्या ऊर्जेचा प्रवाह आणि प्रवास थांबतो! यासाठी जेव्हा जेव्हा आपण उत्साही आणि महत्वकांक्षी होऊन आपल्या इच्छित ध्येयाकडे झेप घेतो तेव्हा तेव्हा हिच सुप्तावस्थेत असलेली ऊर्जा प्रवाही होऊन आपल्याला प्राप्त होते!
वाढणाऱ्या आपल्या वयाशी या ऊर्जेचा काहीही संबंध नाही! हे प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे! जर आपण स्वतःबरोबरच परिवाराशी आणि इतरांशी मोकळेपणाने वागलो तर ही ऊर्जा वाहते अन्यथा सुप्तावस्थेत बंदिस्त होते म्हणूनच मित्रांनो आपण या ऊर्जेला नशिबाच्या आणि योगायोगाच्या आधारावर मोकळ सोडता कामा नये! हा निर्णय केवळ आणि केवळ आपल्याच हाती असतो!- प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो की- आपण ऊर्जेचा हा प्रवाह सतत प्रवाही कसा ठेवावा?
त्याची अगदी सोपी पद्धत आहे तीअशी की — स्वतःला कोणत्याही वैयक्तिक वैचारिक बंधनात न अडकवता आपलं मन सतत मोकळ ठेवावं! यासाठी एकच अट आहे की– मनाच्या इतर सवयीप्रमाणे अगदी ठरवून ही मनाला सतत सवय लावून घेण हे शक्य आणि आवश्यक आहे! सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटेल पण– आपण मनाला नेहमीच मोकळ ठेवू इच्छित असला तर जीवनात जो उत्साह जी ऊर्जा आणि जे काही प्रेम मिळेल त्याची कशातही किंमत करता येणार नाही! *विन विन सिच्युएशन म्हणजे आपणही जिंका आणि मीही जिंकतो!
आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे_” *सर्वे सुखिनः सन्तु -सर्वे सन्तु निरामया*”- सर्वांचं भलं कर! कल्याण कर! सर्वांना सुखी कर! हा जर विचार मनाच्या गाभार्यात आपण खोलवर रुजवला आणि आपण तो विचार जर प्रत्यक्ष कृतीत आणला तर ही ऊर्जा नेहमीच प्रवाहित राहील ! निश्चितच आपल स्वप्न साकार होईल यात यत्किंचितही शंका नाही!- 




