ताज्या घडामोडी
लोहगडला आलेल्या सहलीला दुधिवरे खिंडीजवळील दरीत शाळकरी मुलांची बस कोसळली..
सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभिर दुखापत झालेली नाही.
लोहगडला आलेल्या सहलीला दुधिवरे खिंडीजवळील दरीत शाळकरी मुलांची बस कोसळली..
आर्या क्लासेस, पेण यांच्या बसला अपघात झाला असून, आर्या क्लासेसचे विद्यार्थी व शिक्षक असे एकूण सुमारे ९० जण ४ बस मधून सहलीसाठी आज सकाळी लोहगड किल्ला पाहण्यासाठी आले होते.
किल्ला पाहिल्यानंतर दुपारी ते परत जाण्यासाठी निघाले होते. चार बस पैकी तीन बस पुढे व्यवस्थित गेल्या. पण शेवटची चौथी बस दुधीवरे येथून जात मधून असताना खोल दरीत पडल्याने आज दुपारी तीन वाजता सुमारास अपघात झाला.
अपघातग्रस्त बस मधून २७ जण प्रवास करत होते . दरीत पडलेल्या बस मधून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे व एकही विद्यार्थी गंभीर जखमी झालेला नाही. या बस मधून प्रवास करणारी चार ते पाच शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांना लोणावळा व सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दुधिवरे खिंडीजवळील एका दरीत शाळकरी मुलांची बस कोसळल्याची घटना रविवारी (दि.४) वाजल्याच्या सुमारास घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार लोहगड घेरेवाडीकडील उतारावर एक शाळकरी मुलांच्या बसला अपघात होऊन बस सुमारे ६० ते ७० फुट खोल दरीत कोसळल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभिर दुखापत झालेली नाही. शिवदुर्ग मित्र, स्थानिक ग्रामस्त व लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी बसमधील मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.



