बक्षीस लागल्याचे सांगून वृद्धेची केली फसवणूक दिवाळीत खरेदी केल्याचा दिला संदर्भ. चोर सीसीटीव्हीत कैद.
बक्षीस लागल्याचे सांगून वृद्धेची केली फसवणूक दिवाळीत खरेदी केल्याचा दिला संदर्भ.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ४ डिसेंबर :
बक्षीस लागल्याचे सांगून वृद्ध महिलेला दुचाकीवरून घेऊन जाऊन तिच्याकडील दोन तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर विश्वासघात • करून फसवणूक केली. तळेगाव दाभाडे येथे २६ नोव्हेंबर रोजी • सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे, नगरपरिषद शॉपिंग कॉमप्लेक्स येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी ७२ वर्षीय वृद्धेने बुधवारी (दि. ३०) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला त्यांच्या मुलाला वडापाव घेऊन देण्यासाठी तेली आळीमध्ये आल्या. त्यावेळी एक • अनोळखी व्यक्ती तेथे आली. तुम्ही दिवाळीला कपडे खरेदी केले होते. त्याचे तुम्हाला अडीच तोळे सोने बक्षीस लागले आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, मार्टमध्ये माझे दुकान आहे, असे अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला सांगितले. त्यानंतर रिसीट बनवतो.

.तुमच्या जवळचे सोने काढून द्या, त्याची कच्ची रिसीट बनवतो. तुमचे सोने तुम्हाला परत करतो, मग तुम्हाला बक्षीस मिळेल, असे बोलून अनोळखी आरोपीने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या अंगावरील दोन तोळे गळ्यातील माळ तसेच अंगठी, सोने काढून दिले. ते सोने आरोपीने घेतले. मी लगेच सराफाच्या दुकानातून रिसीट बनवतो. तुंम्ही येथेच थांबा, मी परत येतो, असे बोलून फिर्यादीचा विश्वासघात केला. सोने घेऊन जाऊन आरोपीने फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.




