मंगळवार दि.22 नोव्हेंबर 2022 रोजी मातोश्री कलावती आनंदराव ओव्हाळ यांच्या 20 व्या स्मुर्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आई या विषयावर भव्य असे काव्य वाचन स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.या मध्ये तीन क्रमांक ठेवण्यात आले होते,या स्पर्धेत जवळपास महाराष्ट्रातुन 100 कवींनी सहभाग घेतला होता.
मंगळवार दि.22 नोव्हेंबर 2022 रोजी मातोश्री कलावती आनंदराव ओव्हाळ यांच्या 20 व्या स्मुर्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आवाज न्यूज : मावळ, प्रफुल्ल ओव्हाळ, ३ डिसेंबर.

कार्यक्रम नटसम्राट निळू फुलें नाट्यगृह(हॉल),पिंपळे गुरव पुणे इथे संपन्न झाला. यामध्ये सुरुवातीला म्हणजे दु 1.00 वा. कार्यक्रमाची सुरुवात झाली ,यामध्ये कार्यक्रमाची प्रस्तावना, कलावती आनंदराव ओव्हाळ अल्पसंख्याक बहू उद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ यांनी केले,या वेळी उपस्थित मान्यवरांचे यथोचित शाल,श्रीफळ,पुष्गुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म.भा.चव्हाण (जेष्ठ कवी गझलकार)डॉ धनंजय लोखंडे,मा.प्रभाकर ओव्हाळ(जेष्ठ साहित्यीक) यांची होती.
माझी आई,माझी आई “हा गझलनवाज अशोक गायकवाड यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम झाला.
यामुळे वातावरण अतिशय आईमय झाले होते.यानंतर आई या विषयावर भव्य असे काव्य वाचन स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.या मध्ये तीन क्रमांक ठेवण्यात आले होते,या स्पर्धेत जवळपास महाराष्ट्रातुन 100 कवींनी सहभाग घेतला होता. यांचे परीक्षण मा.प्रभाकर ओव्हाळ आणि डॉ धनंजय लोखंडे यांनी केले.यानंतर लेखक कवी चंद्रकांत ओव्हाळ लिखित “तुंग तिकोन्याची आज्जीमाय”या कादंबरीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर आदर्श माता पुरस्कार देण्यात आले या वर्षाचे आदर्श माता पुरस्कार श्रीमती तुळसाबाई तुकाराम आल्हाट आणि आयु.अनुसया नथूजी कांबळे यांना देण्यात आला.यामध्ये आयु.भाऊराव बहिरु शिंदे यांचा एक विशेष सत्कार करण्यात आला होता.

यावेळी म .भा चव्हाण यांनी लेखक कवी यांचे तोंड भरून कौतुक केले,यावेळी बोलताना ते म्हणाले”संपूर्ण महाराष्ट्रात आईचा जागर अशा भव्य पद्धतीने घालणारा व्यक्ती म्हणजे चंद्रकांत ओव्हाळ हे आहेत, तुंग तिकोन्याची आज्जीमाय या पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले की एक अस्सल मावळी, गावरान आणि कथानक जिवंत समोर उभे करण्याचे काम लेखकाने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केले आहे.यानंतर जेष्ट साहित्यकार प्रभाकर ओव्हाळ यांनी या विषयी बोलताना म्हणाले की आई या विषयाला एका विशेष उंचीवर घेऊन जाण्याचे श्रेय या निमित्ताने लेखक कवी चंद्रकांत ओव्हाळ यांना जात आहे.
तुंग तिकोन्याची आज्जीमाय या विषयी बोलताना ते म्हणाले की माझ्या मावळच्या मातीतला गंध या पुस्तकाला येतोय आणि अस्सल मावळी भाषेचे दर्शन आणि तो बाज आणि तोच साज या पुस्तकात सजला आहे.तसेच या वेळी बोलताना डॉ धनंजय लोखंडे म्हणाले की,पुरस्काराने माणसाला आपल्या केल्या कामाची खरी पावती मिळते आणि समाजाने आपल्या त्यागाची आपल्या भावनांची कदर केली असे होते आणि आज लेखक,कवी चंद्रकांत ओव्हाळ यांनी आदर्श माता पुरस्कार देऊन खरोखर ज्या माता समाजापर्यंत पोहचल्या पाहिजे होत्या त्या पोहचल्या आणि यांचे श्रेय सर्व चंद्रकांत ओव्हाळ यांना जाते.पुस्तक तर अप्रतिम आहे प्रत्येक घटना आणि त्याची मांडणी हे अतिशय जिवंत आणि कलात्मक रित्या लेखकाने मांडली आहे.,असे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी. गाढवे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार, मृण्मयी ओव्हाळ हिने मांडले.



