ताज्या घडामोडी

मळवली , बोरज , जांभूळ , कामशेत रेल्वेगेट बाबत श्रीएकविरा कृती समिती बेमुदत उपोषणाचे किंवा रेलरोकोचे पविञ्यात..

लोणावळा पुणे लोकलफेरी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन पाच तास बंद असल्याने शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय रेल्वेच्या वरिष्ठ आधिकारी यांना निवेदन देणार.

Spread the love

मळवली , बोरज , जांभूळ , कामशेत रेल्वेगेट बाबत श्रीएकविरा कृती समिती बेमुदत उपोषणाचे किंवा रेलरोकोचे पविञ्यात..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी , ३ डिसेंबर.

मळवली , बोरज , जांभूळ , कामशेत रेल्वेगेट बाबत श्रीएकविरा कृती समिती बेमुदत उपोषणाचे किंवा रेलरोकोचे पविञ्यात असल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले. ता.१३ रोजी बेमुदत उपोषणाची दिशा ठरविण्यासाठी श्री एकविरा कृती समितीतर्फे आज कार्ला ग्रामपंचायत कार्यालयाचे जवळ शंकरराव नानाभाऊ हुलावळे सभागृहात आज कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई भरत मोरे यांचे आध्यक्षतेखाली व कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विष्णू गायखे यांचे उपस्थितीमधे या मासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पाटण येथील माजी सरपंच गुलाब तिकोणे , माजी सदस्य दशरथ तिकोणे , भाजेचे माजी सरपंच नंदकुमार पदमुले , भाजे विकास सोसायटी चे चेअरमन बाळासाहेब आंबेकर ,वडेश्वरचे माजी सरपंच काळुराम थोरवे , वेहेरगावचे माजी सरपंच किरण येवले , भाजे विकास सोसायटी चे माजी चेअरमन विठ्ठल वाघमारे , माजी उपसरपंच रघुनाथ मराठे , संजय उबाळे , औंढोली चे माजी सरपंच साईनाथ मांडेकर , तसेच कार्लाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे , भाऊ बारकु हुलावळे , पोलिसपाटील संजय जाधव , मळवलीचे माजी सरपंच उस्मान इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोणावळा , कार्ला येथे ये- जा करणारी व प्रवाशांची सोय करणारी पीएमपीएमएल बस बंद झाल्याने यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

लोणावळा पुणे लोकलफेरी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन पाच तास बंद असल्याने शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय रेल्वेच्या वरिष्ठ आधिकारी यांना  निवेदन  देणार.

जांभूळ भुयारी मार्ग बनवावा. कामशेतला अडचणीचा भुयारी मार्ग काढून रेल्वेवरील पूल बनवावा , मळवली , रेल्वेगेट बंद न करता , जवळ देवलेतील हद्दीत रेल्वेगेट बांधून उड्डाणापूल बांधकाम पूर्ण करावे.तसेच पीएमआरडीए च्या बाबत कृती समितीकडून करण्यात आलेल्या पञव्यवहार व आंदोलनामुळे अधिका-यांचे वतीने यावर फेर विचार करावा , अशी सूचनावजा अहवाल वरिष्ठ अधिकारी व राज्यसरकारला पाठविल्याचे समजले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिँदे यांचेकडे पञव्यवहार करण्यात येणार आहे.

यावेळी ता.६ रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ता.१३ रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.,रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे बेमुदत उपोषण , किंवा रेलरोकोचे आंदोलन करायचे याबाबत भूमिका ता.६ रोजी सर्वानुमते ठरणार आहे.
ता.१३ रोजी होणाऱ्या बेमुदत उपोषणाचे नियोजन करण्यासाठी हे बैठकीचे ता.६ रोजी संपर्क बालग्राम , मळवली येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!