धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचा नफा ६४ लाख रुपये. धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचा नफा ६४ लाख रुपये. धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, 1ऑक्टोबर.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांचे स्वागत अमर खळदे यांनी केले .

लेखापरीक्षण अहवाल विनोद टकले यांनी वाचला सभेचे अध्यक्ष विजय शेटे यांनी आपल्या मनोगत मध्ये पतसंस्था कशी प्रगतीपथावर आहे व प्रगती पथावर असताना २३ वर्ष पतसंस्थेने ऑडिट वर्ग अ जपला पतसंस्थेच्या हितासाठी काही कर्जदारांवर कडक कारवाई करावी लागली ही कारवाई करत असताना सभासद हा पतसंस्थेचा मालक असताना आम्हालाही कारवाई करताना फार दुःख झाले अशी भावना व्यक्त केली.

सर्व सभासदांना लाभांश हा ९% घोषित केला पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले यांनी सांगितले पतसंस्थेचे उद्दिष्ट हे गरजू लोकांना कष्टकरी लोकांना व्यापारी बनवणे व उद्योजक बनवणे हेच आहे पतसंस्थेचे खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार व्यक्त करताना सर्व ठेवीदार कर्जदार सभासद कर्मचारी वर्ग दैनंदिन प्रतिनिधी यांचे आभार मानले.

व असेच प्रेम सदैव पतसंस्थेवर ठेवा व ठेवताल असा विश्वास व्यक्त केला दत्ताशेठ शिंदे दत्ताशेठ पिंजन शंकरराव शिंदे संजय शिंदे कैलास चव्हाण केशव कुल काशिनाथ निंबळे पोपटराव भेगडे मनोहर पगारे दत्तात्रय साळुंखे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतककर्मचारी सर्व दैनंदिन प्रतिनिधी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.



