ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा पहिली सवाते स्पर्धा उत्साहात संपन्न..

पुणे जिल्हा पहिली सवाते स्पर्धा वात्सल्य लॉन्स कुरुळी तालुका खेड याठिकाणी पार पडली. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यातून ५६० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

Spread the love

पुणे जिल्हा पहिली सवाते स्पर्धा उत्साहात संपन्न..

आवाज न्यूज: राजगुरुनगर खेड, ३० सप्टेंबर.

पुणे जिल्हा पहिली सवाते स्पर्धा
वात्सल्य लॉन्स कुरुळी तालुका खेड याठिकाणी पार पडली. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यातून ५६० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे उदघाटन कविता धोंडगे देहूरोड पोलीस यांच्या हस्ते करण्यात आले.

सवाते खेळ हा फ्रेंच -किकबॉक्सिंग या नावाने ही ओळखला जातो.१९२४ मध्ये पॅरिस समर ऑलिम्पिक स्पर्धेत सवाते हा खेळ प्रात्यक्षिक खेळ म्हणून खेळला गेला होता. त्याआधारे २०२४ ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत व या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरीस या ठिकाणी होत आहेत.

हा सवाते खेळ ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.या स्पर्धेसाठी सुहास धाईजे(सचिव – अम्यूचुर सवाते असो महाराष्ट्र राज्य)यांनी मार्गदर्शन केले.यात पिंपरी- चिंचवड ने पहिली ट्रॉफी , पुणे ग्रामीणने दुसरी तर पुणे शहर टीमने तिसरी ट्रॉफी मिळवली.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाम भोसले (अध्यक्ष – शालेय क्रीडा बचाव समिती महाराष्ट्र राज्य)
सुहास धाईजे (सचिव – अमुच्यर सवाते असोसिएशन महाराष्ट्र राज्य)
राहुल पवार सर ( चॅम्पियनशीप डायरेक्ट, महाराष्ट्र राज्य)
कुंदन डोईफोडे (सह सचिव सवाते महाराष्ट्र)
विशाल तरस ,श्रीनाथ लोखंडे,ऋषिकेश कडू,तेजस सुर्वे, ज्ञानेश्वर गायकवाड,नितीन पवार व इतर सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!