श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार व सरदार संध्या राजे दाभाडे सरकार यांच्या उपस्थितीत दुर्गा माता मंदिर तळेगाव दाभाडे येथे कार्यक्रम पार पडला….
श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार व सरदार संध्या राजे दाभाडे सरकार यांच्या उपस्थितीत दुर्गा माता मंदिर तळेगाव दाभाडे येथे कार्यक्रम संपन्न…

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे ,२९ सप्टेंबर.. शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस, दुर्गा माता मंदिर तळेगाव दाभाडे येथे सकाळी देवीचे विधीवत पूजा करण्यात आली. मातेला निळी साडी नेसून व मंदिरात फुलाची सजावट करण्यात आली.

सायंकाळी कुलकर्णी यांचा सुस्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला तद् नंतर आरतीचा कार्यक्रमासाठी साठी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार व सरदार संध्या राजे दाभाडे सरकार उपस्थित होते.
सागर ढेंबे यांनी संबळच्या तालावर आरती संपन्न केली. सदरच्या कार्यक्रमासाठी रो विलास काळोखे रो दीपक फल्ले दिलीप पारेख, रेश्मा फडतरे , प्रशांत ताये, नंदकुमार नागुलपेल्ली, किरण ओसवाल, शशिकांत हळदे, व ईतर माण्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.नगरसेवक गोपाळ परदेशी , शिक्षण मंडळ सदस्य संतोष परदेशी, आयुक्त किशोर परदेशी, प्रमोद परदेशी, प्रेमनाथ परदेशी, चंद़कांत परदेशी, नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



