ताज्या घडामोडी

श्री तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने १० टक्के लाभांश जाहीर..

संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी जाहीर केले.

Spread the love

श्री तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने १० टक्के लाभांश जाहीर..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता.२८(प्रतिनिधी )

श्री तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्षस्थानावरून अशोक जाधव यांनी जाहीर केले.
पतसंस्थेच्यावतीने २४ व्या सर्वसाधारण सभा हाॕटेल चंद्रलोक येथे घेण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष युवराज इंगूळकर , संचालक विनय विद्वांस , सुरेश गायकवाड , श्रीरंग राऊत, प्रकाश सुर्यवंशी , अॕड.प्रथमेश रजपूत , संचालिका. शोभा अशोक जाधव ,  शारदा मनोहर इंगूळकर , व्यवस्थापकीय संचालक आमित कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आंतर्गत लेखापरिक्षक म्हणून वर्षा धवाळकर आणि शासकीय लेखा परिक्षक म्हणून आजय पतंगे यांची पुढील वर्षासाठी नेमणूक केल्याचे तसेच ठराव क्रमांक १ ते ८९ यांना कार्योत्तर मंजुरी देण्याचा ठराव झाला.

यावेळी संस्थेच्यावतीने विषयपञिकेवर असलेले विषय वाचून दाखवत त्यांना मंजुरी देण्यात आली. संस्थेला आर्थिक वर्षामधे १६,१७,३२९रूपये नफा झाला.
यावेळी राखीव निधीसाठी ४,०४,३३२ तरतूद केली.तर सेवक बोनस १ लाख , संशयित बुडीत कर्ज निधीसाठी १०८,००० तरतूद करून १०,०४,६२१ वाटप करण्यचे ठरले.
भागभांडवल १ लाखावरून ३ लाखापर्यंत वाढविण्यात आले.
संस्थेचे वसूल भाग भांडवल १ कोटी ३ लाख नव्वद हजार असून ठेवी ८,३६,९१,०२८ आहेत.
इतार देणी व तरतुदी ७,३१,५२२ आहेत. राखीव निधी ९१,२०,९४५ आहे.
बँकेत गुतवणूक ३,४८,५४,४१८ आहे.
कर्जे ५ कोटी ५७,८६,८९३ आहे.
इतर येणी यामधे इन्कमटॕक्स अपील खर्च १,५८,९२० साह २२,२० ३५७ येणे आहे.
यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची अध्यक्ष श्री.जाधव व संचालक विनय विद्वांस यांनी उत्तरे दिली.
काही संचालक कर्जाचे अर्जावर सही करत नसल्यामुळे कर्जवाटपाला अडथळा येतो आसे विचारले असता; अध्यक्षस्थानावरून श्री.जाधव यांनी दैनंदिन बचत प्रतिनिधीला ३ टक्के कमिशन द्यावे लागते , त्यात संस्थेला १२ टक्के व्याज कर्जवाटपावेळी मिळते , संस्थेला तोटा आसल्याचे सांगताच, इंगवले यांनी जोरदार आक्षेप घेतला..

यावेळी दैनंदिन बचत प्रतिनिधी मीना इंगवले यांनी आम्हाला कष्ट करावे लागतात .तरच पैसे मिळतात,असे सांगितले..
काही सभासदांनी कर्जवाटपाला दैनंदिन रक्कम भरल्या शिवाय कर्ज मिळत नाही.त्यामुळे मध्यमवर्गीय सभासदांना कर्ज घेताना आडथळा येतो ! आडवणूक होते , असे म्हणताच अध्यक्ष व संचालक यांनी दैनंदिन , आवर्ती ठेव ठेवण्यासाठी आम्ही ठराव केला आहे , असे सांगितले.न पटणारे उत्तर दिल्यावरून काही सदस्य नाराज झाले.
यावेळी कर्नाळा बँकेत ठेवलेली रक्कम पाच लाख मिळाली.बाकी सुमारे साठ लाख रक्कम व त्यावरील व्याज असे एक कोटीचे इसपास रक्कम बँक आडचणीत आल्याने बुडण्याची शक्यता असल्याने सभासदांनी काळजी व्यक्त केली.यावेळी काही जेष्ठ सभासद तसेच मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी वकीलाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल व सुवर्णपदक मिळविल्याबद्दल अभिषेक विनय विद्वांस याचा सर्व संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला..

यावेळी नफातोटापञक व ताळेबंद यांचे आणि नफा विभागणी तसेच प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक अमित कदम यांचेतर्फे करण्यात आले.
मनोगतात अध्यक्ष आशोक जाधव , विनय विद्वांस यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्था रौप्य महोत्सवी वर्षी सभासदांचे गुणवंत विद्यार्थांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देणार आसल्याचे सांगितले .आभार उपाध्यक्ष युवराज इंगूळकर यांचेतर्फे मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!