कामशेत शहरात कडक बंद व जाहीर निषेध..
कोथुर्णे गावातील सात वर्षांच्या मुलीच्या हत्ये नंतर कामशेत मध्ये त्यांचे उमटले तीव्र पडसाद...
कामशेत शहरात कडक बंद व जाहीर निषेध
आवाज न्यूजः शिवानंद कांबळे कामशेत प्रतिनिधी ४ ऑगस्ट
कोथुर्णे गावातील सात वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर कामशेत मध्ये त्यांचे तीव्र पडसाद उमटले कामशेत मधील व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायत यांच्या वतीने कामशेत बाजारपेठ बंद होती व्यापारी वर्गाने या बंद मध्ये सामील झाले.
यानंतर कामशेत पोलीस स्टेशन ते शिवाजी चौका पर्यंत मोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चात कामशेत मधील सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना व महिला पण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चाचे रूपांतर शिवाजी चौकात जाहीर सभेत झाले उपस्थितां मध्ये सचिन शेडगे, गणेश भोकरे, तानाजी दाभाडे डाॅक्टर विकेश मुथा,प्रकाश गायकवाड कोंडीबा रोकडे, अभिमन्यु शिंदे, संतोष वीर सरपंच रूपेश गायकवाड आदींनी व महिलांनी सुध्दा आपला तीव्र संताप व्यक्त केला ज्योती शेडगे, वनिता वाघवले,मंदा क्षिरसागर यांनी तीव्र संताप व्यक्त करत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.
अशा नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात फाशी झाली पाहिजे या घटनेचा सर्व नागरिकांनी निषेध करत स्वरा चांदेकर हीस श्रध्दांजली अर्पण करण्यात आली लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे व अशा घटना समाजात पुन्हा होऊ नये यिची खबरदारी घेतली पाहिजे कामशेत पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीस जेरबंद केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले
यावेळी सुकन बाफना, निलेश दाभाडे परेश बरदाडे उपसरपंच वैशाली इंगवले, अंजना मुथा विमल पडावकर अनेक मान्यवर त्याच बरोबर कामशेत मधील सर्व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



