वैशाली विद्यासागर थोरात यांना पी.एचडी…
अरुणाचल प्रदेशमधील हिमालयन विद्यापीठाने प्रा. वैशाली विद्यासागर थोरात यांना इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेची पी.एचडी. नुकतीच बहाल..
वैशाली विद्यासागर थोरात यांना पी.एचडी.
आवाज न्यूज: गुुुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी 04
अरुणाचल प्रदेशमधील हिमालयन विद्यापीठाने प्रा. वैशाली विद्यासागर थोरात यांना इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेची पी.एचडी. नुकतीच बहाल केली.
प्राध्यापक वैशाली थोरात यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील झिम्बी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘विस्तारीत राऊटिंग प्रोटोकॉल कार्यप्रदर्शन पॅरामिटर सुधारित रचना’ याविषयावर प्रबंध सादर केला. त्यासाठी डॉ. ललितकुमार वधवा यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रा. वैशाली थोरात या डी.वाय.पाटील स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅकॅडमी आंबी तळेगाव येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहे.
यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक व सहकार्यांचे आभार मानले. प्रा. वैशाली थोरात या चिंचवड येथील रहिवासी असून सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असून चिंचवड प्रवासी संघाच्या सल्लागार म्हणून अनेकवर्षे कार्यरत आहे. पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणार्या विद्यार्थी, महिला, प्रवासांना भेडसावणार्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी कार्यतत्पर राहून चिंचवड प्रवासी संघाला देखील सहकार्य करीत आहे.



