ताज्या घडामोडी

वडगाव मावळ : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकास अटक…

आरोपीकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Spread the love

वडगाव मावळ : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकासअटक करण्यात आली आहे.

आवाज न्यूज: वडगाव  प्रतिनिधी दि. २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वडगाव मावळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला वडगाव तळेगाव दाभाडे फाटा येथून ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी ऋषीकेश सुदाम बोत्रे (वय २९, रा. खालुंब्रे ता खेड जि. पुणे) यास अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी (दि. २९) रोजी वडगाव मावळ न्यायलायात हजर करण्यात येणार आहे. त्याची माहिती पोलिसांनी दिली.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमख यांनी पोलीस ठाण्याच्या
हद्दीत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गस्त घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गस्त घालत असताना बेकायदा गावठी पिस्टल व काडतूस बाळगत असलेला आरोपी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वडगाव – तळेगाव दाभाडे फाटा, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर उर्से बाजूला आरोपी  संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्यावेळी मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहा. फौजदार सुनील जावळे, कैलास कदम, पोलीस अमलदार श्रीशैल कंटोळी, मनोज कदम, संजय सुपे, अमोल तावरे, भाऊसाहेब खाडे, गणपत होले यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!