ताज्या घडामोडी

तळेगाव शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे. रो मंगेश गारोळे 

अमृत महोत्सवी" वर्षानिमित्त भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत "75" दिवस मोफत बूस्टर डोस

Spread the love

 

तळेगाव शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे. रो मंगेश गारोळे 

आवाज न्यूज: प्रतिनिधी ,तळेगाव दाभाडे २८ जुलै  प्राथमिक आरोग्य केंद्र,तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत “75” दिवस मोफत बूस्टर डोस व पहिला व दुसरा डोस यांच्या लसीकरण केंद्रांचा शुभारंभ रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो मंगेशजी गारोळे,वैद्यकीय अधिकारी उन्मेष गुट्टे,रोटरी सिटीचे अध्यक्ष रो दीपक फल्ले,रो विलास काळोखे,रो संजय मेहता,रो सुरेश शेंडे,रो शाहीन शेख,रो किरण ओसवाल,रो भगवान शिंदे,रो मिलिंद निकम,रो रेश्मा फडतरे,रो वैशाली खळदे,रो प्रशांत ताय,रो तानाजी मराठे,रो चेतन पटवा यांच्या उपस्थितीत खालील ठिकाणी संपन्न झाला.

1) रो डॉ सौरभ मेहता,अश्विनी डेंटल क्लिनिक
2) रो डॉ धनश्री काळे,सनशाइन क्लिनिक
3) रो डॉ रोहित मिणियार,स्वस्थ्या क्लिनिक
4) डॉ मधुरा निकम,इंद्रायणी क्लिनिक,आंबी
या सर्व ठिकाणी लसीकरण चालू करण्यात आले..

रोटरी सिटीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना तळेगाव शहरातील सर्व नागरिकांनी तळेगावला करोना मुक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने आयोजित केलेल्या या लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन तळेगाव शहराला सुदृढ बनवावे असे आवाहन असिस्टंट गव्हर्नर रो मंगेश गारोळे यांनी केले तर अध्यक्ष दीपक फल्ले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राने रोटरी सिटीला बरोबर घेऊन हा उपक्रम केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष नितीनजी मराठे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले.

“प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बूस्टर डोस,प्रथम व द्वितीय डोस साठी होणारी गर्दी लक्षात घेता जर तळेगाव शहरात आणखीन काही ठिकाणी आपण लसीकरण केंद्र चालू केली तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी कमी होऊन तळेगाव शहरातील नागरिकांना जवळ लसीकरण केंद्र उपलब्ध होईल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेतील त्या उद्देशाने आपण चार वेगवेगळ्या ठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू केले आहे तळेगाव स्टेशन येथील पेट्रोल पंपा समोर पाचवे लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचा मनोदय रो किरण ओसवाल यांनी व्यक्त केला.

रो विलास काळोखे व आरोग्य अधिकारी श्री उन्मेष गुट्टे यांनी तळेगाव शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून आपल्या तळेगाव शहराला सुदृढ बनवावे असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!