ताज्या घडामोडी

नूतन अभियांत्रिकीमध्ये सीईटी अभ्यासतंत्र विषयावर चर्चासत्र..

अभियांत्रिकीच्या विविध शाखांविषयी माहिती आदी विषयांवर करिअर मार्गदर्शक आणि तज्ञ वक्ते प्रा. विवेक वेलणकर, तसेच चंद्रशेखर निकम, संचालक रजत अकॅडमी, पुणे यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.

Spread the love

नूतन अभियांत्रिकीमध्ये सीईटी अभ्यासतंत्र विषयावर चर्चासत्र

आवाज न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी२८ जुलै

एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी १०: ३० वाजता तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ” सीईटी ला जाता जाता ” या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात सीईटी चे स्वरूप, परीक्षा देताना घ्यावयाची काळजी, वेळेचे नियोजन व व्यवस्थापन, शेवटच्या काही दिवसांत गुण वाढवण्यासाठी अभ्यासाच्या टिप्स, विविध प्रवेश परीक्षेच्या तयारीचा प्राधान्यक्रम व एकत्रित अभ्यासाचे नियोजन, बारावी नंतर उपलब्ध संधी व अभियांत्रिकीच्या विविध शाखांविषयी माहिती आदी विषयांवर करिअर मार्गदर्शक आणि तज्ञ वक्ते प्रा. विवेक वेलणकर, तसेच चंद्रशेखर निकम, संचालक रजत अकॅडमी, पुणे यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.

विद्यार्थी व पालकांच्या अभियांत्रिकी मधील करिअर प्रवेशप्रक्रिया व ऑनलाईन सीईटी विषयी असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या चर्चासत्रात मिळतील. तरी विदयार्थी व पालकांनी चर्चासत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा आणि प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!