ताज्या घडामोडी

लोणावळ्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी ओ बी सी आरक्षण सोडतीत प्रभाग एक अ व प्रभाग २ अ मधे ओबीसी महिला ;तर प्रभाग १३ अ मधे ओबीसी पुरूष आरक्षण सोडत काढण्यात आली.

महिलांसाठी निम्यापेक्षा जास्त जागा असूनही महिलांची संख्या तुलनेने कमी होती..

Spread the love

लोणावळ्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी ओ बी सी आरक्षण सोडतीत प्रभाग एक अ व प्रभाग २ अ मधे ओबीसी महिला ;तर प्रभाग १३ अ मधे ओबीसी पुरूष आरक्षण सोडत काढण्यात आली.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २8 जुुुलै:

आज दुपारी बारा ते एक चे सुमारास ओबीसी आरक्षणे काढण्याची प्रक्रिया नियंञक आधिकारी तथा उपजिल्हाधिकारी , भूसंपादन कार्यालय क्र ६ पुणे चे अधिकारी सुभाष भागडे आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडीत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी कर विभागातील अधिकारी शिवाजी मेमाणे , तसेच उपमुख्याधिकारी भगवान खाडे उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १ अ )ओ बी सी महिला ,ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक २ अ) ओबीसी महिला , ब) सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ३ अ) आनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ४ आ) आनुसूचित जाती , ब)सर्वसाधारण ,
प्रभाग ५ अ) सर्वसाधारण महिला , ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक ६ अ) सर्वसाधारण महिला , ब) सर्वसाधारण ,
प्रभाग ७ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक ८ अ ) आनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९अ) अनुसूचीत जाती, ब) सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक १० अ) सर्वसाधारण महिला , ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक ११ अ) आनुसूचित जमाती महिला ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक १२ अ) सर्वसाधारण महिला ब) ,सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक १३ अ) ओबीसी पुरूष , ब) सर्वसाधारण महिला , क) सर्वसाधारण महिला.

  • असे सुमारे तेरा प्रभागात २७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले .त्यात नऊ सर्वसाधारण महिला , दोन ओ बी सी महिला , दोन आनुसूचित जाती महिला व एक आनुसूचित जमाती महिला आसे १४ महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले.
    दोन आनुसूचित जाती , आणि १० सर्वसाधारण आणि एक ओबीसी पुरूष यांचेसाठी आरक्षणे जाहीर झाली आहेत.
    यावेळी श्री सावित्रीबाई फुले कन्याशाळेतील दोन विद्यार्थीनी यांचेकडून आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
    यावेळी आनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

महिलांसाठी निम्यापेक्षा जास्त जागा असूनही महिलांची संख्या तुलनेने कमी होती.उपस्थितांमधे माजी उपनगराध्यक्ष मारूती तिकोणे ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर , माजी नगरसेवक दत्ताञेय येवले , विशाल पाडाळे , राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवि पोटफोडे , औढे खुर्द चे माजी सरपंच अर्जून पाठारे , माजी उपसरपंच नंदू विश्वासराव , भाजपचे माजी शहराध्यक्ष दादा उर्फ सूर्यकांत धुमाळ , काँग्रेसचे माजी नगरसेवक निखिल कविश्वर , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!