ताज्या घडामोडी

मोरया ढोल पथकाचे वाद्य पूजन  ।।।

वाद्यपूजन शुभारंभ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, बाळासाहेब ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव यांच्याहस्ते पूजन। ।।

Spread the love

मावळात, मोरया ढोल पथकाचे “वाद्य पूजन” 

आवाज न्यूज:वडगाव मावळ, मोरया ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन शुभारंभ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, पथकाचे आधारस्तंभ बाळासाहेब ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव आणि ढोल पथकाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या महासंकटामुळे सर्वच पारंपरिक सणांवर बंदी आल्याने शासनाने वाद्य कामास परवानगी नाकारली होती. आता कोरोनाची लाट जवळपास कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहेत. तसेच शासनाने सर्व नियम शिथिल केले आहेत. यावर्षी मावळसह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल पथकांचा आवाज जोशात घुमणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊन वादन करणा-या मोरया ढोल पथकाचा आज अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत वादन सरावास प्रारंभ करण्यात आल्याचे पथकाचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!