कामशेत:- पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत
आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधि नाणे मावळ परिसरात पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे मावळात, भातशेती हे प्रमुख पीक मानले जाते भात शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. शिवाय मावळात पावसाचे प्रमाण जास्त आहे, पण गेली काही वर्षं पाऊस उशिरा पडतो त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम होत आहे. ह्या वेळी पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते काय अशी शंका निर्माण झाली आहे .शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहेत गेली दोन दिवस ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची चिन्हे दिसत आहेत. पण प्रत्यक्षात पाऊस मात्र पडत नाही, थोडीशी सर येते पाऊस निघून जातो गेली पंधरा दिवस पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होते, अजून ही प्रतिक्षा संपलेली नाही जो काही पाउस झाला तो शेतीसाठी पुरक नाही शिवाय उलट जो काही प्रमाणात पाऊस झाला त्या पावसाने येणारे पीक कमकुवत, व पातळ व ती जास्त काळ तग धरू शकणार नाही. कालांतराने ते पीक नष्ट होऊन पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल हे एक मोठं संकट शेतकर्यांपुढे निर्माण होईल अशी चिंता शेतकरी वर्तवत आहेत. त्यामुळे आता दोन दिवसात पाऊस पडणे अतिशय गरजेचे आहे. तसे सध्या पावसाचे वातावरण आहे, त्यामुळे पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देऊन रोपे उगवली आहे.



