ताज्या घडामोडी

मावळ तालुक्यात एकाच वेळी १२७ ठिकाणी ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.

रामदास काकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद.

Spread the love

मावळ तालुक्यात एकाच वेळी १२७ ठिकाणी ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.रामदास काकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे, वार्ताहर :रामदास काकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यात तब्बल १२७ ठिकाणी ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तालुक्यात शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, अभिषेक असे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मावळ तालुक्यातील गावोगावी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला, तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, भजन, ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, व्याख्याने अशा विविध प्रकारे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला गावांमध्ये रामदास  काकडे यांच्यातर्फे शिवप्रतिमा, मिठाई, शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी आवाहनात्मक पत्रक देण्यात आले होते.
रामदास  काकडे म्हणाले, की छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की एक वेगळीच स्फूर्ती मिळते उत्साह निर्माण होतो. यंदापासून दरवर्षी या सर्व गावांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तरुणाईमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत, हा या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!