ताज्या घडामोडी

भाजपा स्थापनादिन ; पिंपरी – चिंचवड शहरात अभिमान अभियान

Spread the love

पिंपरी : भाजपा स्थापना दिनी ( दि 6 एप्रिल) रोजी शहरात अभिमान अभियान सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रवक्ते व संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक सहा ते दहा एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीमध्ये अभिमान अभियान राबविण्यात येणार आहे.तसेच शहरातील सर्व शक्ती केंद्रांवर मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!