ताज्या घडामोडी

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचा मोठा दणका

ईडीने संपत्ती गेली जप्त

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज सक्तवसुली संचालनालयाने मोठा दणका दिला आहे. ईडीने राऊत यांची  संपत्ती जप्त केली आहे. अलिबाग येथील काही भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आज राऊत यांच्यावरील कारवाईची माहिती दिली आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही ईडीने संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी यांना चौकशीची नोटीस पाठवली होती.कथीत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्याशी संजय राऊत यांचे निकटचे संबंध आहे. त्याच प्रकरणात आज संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!