ताज्या घडामोडी

विज्ञान दिनानिमित्त मळवंडी ढोरे शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

Spread the love

तळेगाव : मळवंडी ढोरे शाळेमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून नुकतेच विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.इ.१ ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले..वनस्पतींची वाढ,वनस्पतींचे अवयव,मानवी शरीर रचना,सजातीय विजातीय विद्युत प्रभार, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे,पदार्थाची घनता व आकारमान,फुलांचे विविध भाग,वस्तुंचे वजन व आकारमान इ.अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी स्व प्रयोगातून सादर केले व प्रयोगाची माहिती सांगितली.


शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने उपाध्यक्ष रेणूका तरस,पोपट ढोरे,अनिल ढोरे,योगेश ढोरे,धनश्री ढोरे,माधवी शिंदे,सारीका ढोरे,झामाबाई ढोरे,प्रिया ढोरे,राजश्री ढोरे इ.पालकांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक राजू भेगडे व शिक्षक सोमलिंग रेवणशेट्टे,साधना बो-हाडे,पूजा राऊत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!