ताज्या घडामोडी

पल्स पोलिओ मोहिमेस तळेगांव दाभाडे शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

तळेगाव : पल्स पोलिओ डोस प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यास तळेगांव दाभाडे शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोटरी सिटीचे संस्थापक रो विलास काळोखे यांच्या शुभहस्ते तर लायन्स क्लब या ठिकाणी रोटरी सिटीचे अध्यक्ष रो राजेश गाडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
रोटरी क्लब तर्फे दरवर्षी 115 देशा मध्ये याचे आयोजन करण्यात येते. तळेगाव शहरामध्ये 24 ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये 28 ठिकाणी पोलिओ डोसची केंद्र ठेवण्यात आली होती अशी माहीती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ उमेष गुट्टे,डॉ राजेंद्र मोहिते डॉ दिनेश महालिंगे यांनी दिली.

यावेळी रो दीपक फल्ले रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रो किरण ओसवाल रो तानाजी मराठे  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख रो संतोष शेळके ,संजय मेहता ,सुरेश शेंडे प्रशांत आगलावे व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी वर्गाने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!