ताज्या घडामोडी

सिंहगडचा कुंजन दळवी आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावर

Spread the love

काल (दि.२५ फेब्रूवारी) रोजी इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव येथे आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्गत आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये( बेंच प्रेस स्क्वॅट डेड लिफ्ट) एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स कुसगाव लोणावळा महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.कॉम. मध्ये शिकत असलेल्या कुंजन दळवी या विद्यार्थ्याने १०५ कि.ग्र.वजन गटामध्ये एकूण ३४५ कि. ग्रॅम वजन उचलुन द्वितीय क्रमांक पटकाविला. डॉ. अनिल कमलापुरे यांनी मार्गदर्शन केले.

लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड व क्रीडा विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉ. प्रदीप नलावडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!