ताज्या घडामोडी

शिवमुद्रा युवा मंचच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध ऑनलाइन स्पर्धा 

Spread the love

तळेगाव : शिवमुद्रा युवा मंचच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधत तळेगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध, चित्रकला, वक्तृत्व व शिवकालीन वेशभूषा असे स्पर्धेचे स्वरूप असून चार गटात स्पर्धा विभागली गेली आहे. पहिली ते चौथी पहिला गट, पाचवी ते सातवी दुसरा गट, आठवी ते दहावी तिसरा गट व खुला गट असे गट स्पर्धेसाठी आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.या स्पर्धेत तळेगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व सिद्धार्थ किल्लावाला मित्रपरिवार यांच्या सौजन्याने स्पर्धा होणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!