ताज्या घडामोडी
मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी यशवंत मोहोळ
पवनानगर : मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी यशवंत रावजी मोहोळ यांची निवड जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याने मावळ तालुका अध्यक्ष पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवर मोहोळ यांची निवड करण्यात आली.

काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार निवड करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिले आहे. मोहोळ यांनी आजपर्यंत पक्षाचे एकनिष्ठ काम केले असून युवक काँग्रेस उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा अध्यक्ष पद भूषविले आहे.




