ताज्या घडामोडी

कामशेत येथे रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू 

Spread the love

कामशेत : कामशेत जवळील पाथरगाव हद्दीत रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रेनची धडक बसल्याने एका सांबराचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना आज ( दि. 28) पहाटे पाच ते सहा या दरम्यान घडली.

या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक टीमचे सदस्य अनिल आंद्रे, दक्ष काटकर ,सचिन वाडेकर,यश वाडेकर ,हनुमंत वाडेकर ,वन परिमंडळ अधिकारी जाधव आणि कर्मचारी यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

मृत सांबराला नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश भोसले यांनी सांबराची तपासणी केली. पुढील विधी साठी सांबराला वडगाव येथे पाठवण्यात आले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!