ताज्या घडामोडी

इंद्रायणी महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी युवराज काकडे 

Spread the love

तळेगाव : तळेगाव येथील युवा उद्योजक युवराज काकडे यांची इंद्रायणी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रती एकमताने निवड झाली आहे.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या वतीने निवडीचे पत्र युवराज काकडे यांना देण्यात आले. ही निवड महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 परिनियम 97 नुसार करण्यात आली आहे.

काकडे हे एक यशस्वी बांधकाम व्यवसायिक म्हणून 2010 पासून तळेगाव शहराला परिचित आहेत. ते अनेक संस्थांवर कार्यरत आहेत. भारतीय सिव्हिल इंजिनियर असोसिएशन बेंगलोर या संस्थेचे ते 2016 पासून काम पाहतात. तर मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन या संस्थेवरही ते कार्यरत आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेत नवीन कोर्स आणण्यासाठी व क्रीडांगण बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!