ताज्या घडामोडी

शौर्य दिनानिमित्त लोणावळ्यात प्रति विजय स्तंभाची उभारणी करुन मानवंदना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अनुयायांना भीमा कोरेगाव येथे गर्दी न करण्याचे आवाहन

Spread the love

लोणावळा : आज (दि.१ डिसेंबर ) रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) मावळ तालुका व लोणावळा शहरच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दीना निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी भीमा कोरेगाव येते येणाऱ्या अनुयाना covid 19 च्या प्रादुर्भावामुळे गर्दी न करण्याच आव्हान केले. त्याला अनुसरून पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांतजी वाघमारे  व मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी व अभिवादन करण्याकरिता प्रति विजय स्तंभ लोणावळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येते उभारण्यात आला.

यावेळी लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के,उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे,पुणे जिल्हा सरचिटणीस गणेशजी गायकवाड ,मावळ तालुका महासचिव अशोक सरवते,विजय जाधव उपाध्यक्ष मिलिंद भालेराव,जयराम कदम,सुधाकर मिसळ,अमोल भालेराव, रमेश कदम,दिनेश दामोदरे,गोपी मानकर यांनी महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विजय स्तंभाला अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!