माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; १२ भाविकांचा मृत्यू अनेक जखमी
जम्मु : येथील कटरा मधील माता वैष्णो देवी मंदिर परिसरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
नववर्षाच्या निमित्ताने अनेक जण देवदर्शन घेत असतात.तीर्थक्षेत्रावर या दिवशी गर्दी होते. नववर्षाच्या स्वागतासाठी माता वैष्णोदेवी परिसरात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने डोंगरावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गर्दीवर नियंत्रण न राहिल्याने भाविकांनी पळापळ केली. यातच चेंगराचेंगरी होऊन 12 भाविकांचा मृत्यू झाला असून प्राथमिक माहितीनुसार 22 ते 25 भाविक जखमी झाले आहेत. मृतांची व जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही.
याठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त करत मदत जाहीर केली आहे.



