ताज्या घडामोडी

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार, एक जखमी

Spread the love

कामशेत : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ताजे गावच्या हद्दीमध्ये एर्टीगा गाडीला झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी डॉ. अभिजित कोगनाळे यांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

प्रकाश बसवनाथ घोडके व राजमती नागेश गाडेकर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर शालन घोडके या गंभीर जखमी झालेल्या आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२८) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एर्टीगा गाडीला ताजे गावच्या हद्दीत किलोमीटर क्र. ७३/१०० जवळ कार चा टायर फुटून अपघात झाला. अपघातात प्रकाश बसवनाथ घोडके, राजमती नागेश गाडेकर (रा. मुंबई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


शालन शरणाप्पा घोडके (वय ४५) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने या करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!