ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भांगरवाडी प्रभागात झाडांची छाटणी

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने उंच व धोकादायक झालेल्या वृक्षांची छाटणी करण्यात येत आहे. ठाकर लोक झाडावर चढून दोरी लावून आलगद वृक्षाच्या फांद्या तोडण्यात वाकबगार असल्याने नगरपरिषदेच्या अधिकारी व ठेकेदार यांचे वतीने हे काम सकाळी सहापासून सुरू आहे.

झाडावर चढणारे तरूण कामगार डोक्यात सुरक्षेसाठी काहीही न घालता उंचावर चढणे , फांद्या तोडणे , रस्सी बांधून खाली घेणे आदी कामे करताना दिसले. आत्यंत काटक , आणि चलाखीने हे तरूण जिवाची बाजी लावून झाडावर चढण्याचे व धोकादायक पध्दतीने धोका पत्करून फांद्या तोडत असल्यामुळे पहाणारे लोकही अचंबित होताना दिसतात.

नगरपरिषदेच्या वतीने त्यांना सुरक्षा साधने पुरवणे महत्त्वाचे असून याकडे डोळेझाक केली जात आहे. अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जिवावर बेतू शकते , हे माञ नगरपरिषदेच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे लक्षात येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!