ताज्या घडामोडी

होम फॉर जी चिल्ड्रन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महागाव गावाला रुग्णवाहिका अर्पण

Spread the love

महागाव : होम फॉर जी चिल्ड्रन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे व ग्रामपंचायत महागाव यांच्या संयोगाने महागाव गावाला रुग्णवाहिका अर्पण करण्यात आली. होम फॉर चिल्ड्रन फाउंडेशन ही संस्था समाजाची निगडीत अनेक विषयावर काम करत आहे.

पवन मावळ महागाव हे गाव मोठ्या लोकसंख्येचा म्हणून ओळखलं जात आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे व ग्रामपंचायत महागाव यांच्या पुढाकाराने होम फॉर चिल्ड्रन फाउंडेशन या संस्थेने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे .

यावेळी महागावचे सरपंच सोपान सावंत आपल्या मनोगतात म्हटले की, “रुग्णवाहिका मुळे महागाव व शेजारील पर्यंत पंचक्रोशीतील रुग्णास त्याचा लाभ घेता येईल व रुग्णांना जलद हॉस्पिटलची सेवा मिळेल म्हणून मी फाऊंडेशनचे आभार व्यक्त करतो”.

यावेळी  होम फोर जी चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्षा कॅरोलिन मॅडम ( जर्मन ) , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे समाज कल्याण विभाग प्राध्यापक प्रकाश यादव, महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोपान सावंत, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!