पश्चिम विभागीय सहसूविधा केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘औषधी वनस्पतींची शाळा’ कार्यक्रमाचे आयोजन
मावळ : पश्चिम विभागीय सहसूविधा केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी औषधी वनस्पतींची शाळा ” या कार्यक्रमाचे अनावरण मावळ मधील मोहिते वाडी येथे काल २६ डिसेंबर रोजी करण्यात आले.

देशात आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने मा. पंतप्रधान साहेबांनी अनेक घोषणा केल्या आहेत व नवोन्मेष संकल्पनाचा त्यात समावेश आहे, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम सुरू करण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून औषधी वनस्पती शेतीला चालना देण्यात येत आहे.
औषधी शेती वाढावी, औषधी वनस्पतीचा व्यापार वाढवा व त्या आधारे वनस्पतीजन्य औषधे वाढावे असे प्रयत्न केले जात आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ – पश्चिम विभागीय सुविधा केंद्र आहेत आणि त्याच्या माध्यमातून औषधी वनस्पती वरील शिक्षण संशोधन व विस्तार कार्य केले जात आहे.आज दिनांक 26 डिसेंबर रोजी क्षितिज वाटिका , मोहिते वाडी फाटा , मावळ येथे पश्चिम विभागीय सहसुविधा केन्द्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतात “औषधी वनस्पतींची शाळा” या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन पुणेकर यांनी औषधी वनस्पतींची ओळख करून दिली व शिवार फेरीच्या माध्यमातून “देशी व विदेशी तन आणि त्यांचे फायदे व तोटे” या विषयावर शेतकरी बांधवांशी चर्चा केली. तसेच पश्चिम विभागीय सहसुविधा केंद्राचे क्षेत्रीय संचालक तथा वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांनी औषधी वनस्पतीचे महत्त्व त्यांचे कृषितंत्र, लागवड पद्धती, काढणी नंतरच्या प्रक्रिया यावर प्रात्यक्षिक करून सकाळ माहिती शेतकरी बांधवाना दिली. बरोबरच केंद्राचे सहसंचालक मानीश पुरी गोस्वामी विविध वनस्पतींची लागवड पद्धती, रोग नियंत्रण, उत्पादन वाढवण्यासाठी घ्यावयाची काळजी, व वाजार यांबद्दल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अनावरण करताना प्रा. (डॉ) दिगंबर मोकाट यांनी “शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे योग्य मार्गदर्शन करन्यासाठी व त्यांचे आर्थिक महत्व पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे असे मत मांडले”
या कार्यक्रम प्रसंगी होरायझोन संस्थेचे मेजर जनरल शशिकांत पितरे, ब्रिगेडर अनिल आपटे, कर्नल मुघोलकर, सुभेदार राजाराम दगडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सहसुविधा केन्द्रातून प्रवीण चव्हाण, योगेश बेंद्रे, पवन कुमटकर, समीर मैती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंचालक मनीष पुरी गोस्वामी यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रीकी अधिकारी अजय गांगुर्डे यांनी केले.




